mr_obs-tn/content/02/11.md

1.6 KiB

भूमि शापित झाली

आदामाच्या आज्ञा मोडण्याची शिक्षा म्हणून, भूमि यापुढे फलदायी होणार नव्हती. आदामाला पुरेसे अन्न खावयाला मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागणार होते.

तुम्ही मरणार

त्यांच्या आज्ञाभंगामुळे अंतिम शिक्षा मृत्यु होती. अध्यात्मिक मृत्यू म्हणजे देवापासून आमचे वेगळे होणे. शारिरीक मृत्यू म्हणजे शरिरापासून आमचे वेगळे होणे.

परत मातीला मिळणे

देवाने आदामाला माती पासून तयार केले आणि त्याला जीवन दिले. पापाचा परिणाम म्हणून, त्याचे जीवन घेतले जाईल आणि त्याच्या शरीराचे विघटन होऊन परत माती होईल.

हव्वा म्हणजे ‘जीवन

देणारी’

सर्व लोकांची आई

म्हणजे ती सर्व मानवांची महिला पूर्वज होईल. काही भाषांमध्ये म्हणतात, “ती सर्व लोकांची आजी होईल.”