mr_tq/heb/01/01.md

1.5 KiB

भूतकाळात देव कशा रीतीने बोलला?

प्राचीन काळी देव अंशाअंशांनी व प्रकारा प्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला[१:१].

ह्या काळाच्या शेवटी देव कसा बोलला आहे?

ह्या काळाच्या शेवटी देव पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे[१:२].

विश्व कोणाच्या द्वारे निर्माण झाले आहे?

विश्व देवाच्या पुत्राच्या द्वारे निर्माण झाले आहे [१:२].

कशाने विश्वाधार आहे?

देवाच्या पुत्राच्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे [१:३].

पुत्र देवाच्या गौरवाचे तेज आणि तत्वाचे प्रतिरूप कसे व्यक्त करतो?

पुत्र देवाच्या गौरवाचे तेज आणि तत्वाचे प्रतिरूप स्वतः व्यक्त करतो[१:३].